वाघाळेजवळ कालव्यात मोटार कोसळून दोघांचा मृत्यू

Image may contain: one or more people
वाघाळे, ता. 15 जानेवारी 2020: वाघाळे (ता. शिरूर) येथे चासकमानच्या डाव्या कालव्यात मंगळवारी (ता. 14) रात्रीच्या वेळी चारचाकी गाडी पडून चुलता पुतण्याचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना आहे.

बापू बाळू रासकर (वय 36) आणि लक्ष्मण ऊर्फ लखन भानुदास रासकर (वय 23, दोन्ही रा. अण्णापूर, ता. शिरूर जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. मोटार व मृतांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.


मंगळवारी सकाळी वाघाळे परिसरात चासकमानच्या डाव्या कालव्यात चारशे क्युसेसने पाणी आले आहे. रात्रीच्यावेळी मोटारीमधून लक्ष्मण व बापू हे प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने चारचाकी कालव्यात कोसळली.कालव्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार मधील दोघांनाही बाहेर पडता आले नाही यातच दोघांचा मृत्यु झाला.घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. राञी उशिरा कालव्यात पडलेल्या मोटारी  मधील दोघांनाही बाहेर काढण्यात आले.या घटनेची वार्ता कळताच अण्णापूर गावावर शोककळा पसरली. शिरूर तालुक्यात सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबतचा पुढील तपास रांजणगाव पोलिस करत आहेत.

Image may contain: 2 people, people smiling, people standing

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या