काय आहे मकरसंक्रातीचे महत्व

मकर संक्रात हा सण दर वर्षी १४ जानेवारी या दिवशी येतो.पण या वर्षी हा सण १५ जानेवारी या दिवशी आलेला आहे.

या वर्षी संक्रांतीचा मुहूर्त हा बुधवार १५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरु होणार असून सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यत हा शुभ मुहूर्त राहणार आहे.संक्रातीचा पुण्य काल हा ७ वाजून १५ मिनिटांनी सुरु होणार असून सकाळी ९ वाजता संपणार आहे.मकर संक्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो.भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आधल्या दिवशी येतो.भोगी हा सण इंग्रजी वर्षाचा पहिला सण असतो.या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत ग्रामीण भागात आजही आहे.भोगी हा सण आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो.

आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह,आनंद,एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे एकत्रित भाजी करतात.त्यामध्ये हरभरा,वाटाणा,फ्लावर,घेवडा,वांगे,गाजर,पावटा अशा वेगवेगळ्या भाज्या एकत्रित करूनं अतिशय उत्कृष्ट भाजी बनवतात.या दिवशी तीळ लावलेल्या भाकरी करतात.आणि शेतकरी या तीळ लावलेल्या भाकरीचा आनंदाने आस्वाद घेतात.माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य यावे,असा संदेश या सणाच्या माध्यमातून घेतला जातो.आपल्या भारतामध्ये म्हणजेच हिंदू धर्मामध्ये मकर संक्रात हा प्रमुख सण मानला जातो.

मकर संक्रात हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.या दिवसांमध्ये शेतकऱ्याचे मळे खूप फुललेले हिरवे असतात.आणि तेच वाण स्रिया एकमेकींना या दिवशी आनंदाने देत असतात.संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो.आणि रात्र लहान होत जाते.कारण मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.मकर संक्रांतीला सुवासिनी ह्या एकमेकींना सुगड्याचे वाण देतात.या वाणात हरभरा,वाटाणा,बोर,ऊस,गव्हाच्या ओंब्या,तीळ असे वेगवेगळ्या वस्तू असतात..मकर संक्रातीला विशेष करून लहान मुले खूप आनंदानी पतंग उडवतात.

थंडीच्या काळामध्ये संक्रातीच्या तिळाचे फार महत्त्व समजले जाते.थंडीच्या दिवसात तिळामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी मदत होते.तिळाचा जेवणातील वापराचा दुसरा अर्थ आहे स्निग्धता.स्निग्धता म्हणजेच स्नेह व मैत्री.म्हणून स्नेहाचे गुळ व तीळ सोबत मिश्रण करतात.स्नेहाची गोडी वाढावी..म्हणून या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करून स्नेह वाढवायचा आणि नवीन स्नेहसंबंध जोडायचे.संक्रातीच्या जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेकांना तिळगुळ दिले जाते.दिवाळी नंतरचा आणि नवीन वर्षात येणार पहिला सण म्हणजे मकर संक्रात होय.या दिवशी संक्रातीची पूजा केली जाते.या दिवशी दानाचे फार महत्त्व आहे.या दिवशी जी माणसे दान देतात.मकर संक्रातीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते.

किंक्रात म्हणजे संक्रातीदेवीने मकर संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले.म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.किंक्रात हा दिवस सर्वसाधारणपणे अशुभ मानला जातो.पंचांगात हा दिन करिदिन म्हणून दाखवलेला असतो.

किरण दिपक पिंगळे (रांजणगाव गणपती)
मो ९३७३५४१३०८

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या