वारसा फाउंडेशनकडुन विविध क्षेञातील मान्यवरांचा गौरव

Image may contain: 18 people, people smiling, people standingशिरुर,ता.१७ जानेवारी २०२०(प्रतिनीधी) : राजमाता जिजाउ जयंतीनिमित्त वारसा फाउंडेशनच्या वतीने शिरुर शहरात विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा पुरस्कार देउन गौरव करण्यात आला.

शिरुर शहरात वारसा फाउंडेशनच्या वतीने राजमाता जिजाउ जयंतीनिमित्त दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.तसेच विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो.या वर्षी न्यायाधीश पदावर निवड झालेल्या अक्षय पांडुरंग ताठे यांना छञपती शिवराय पुरस्कार देउन गौरविण्यात आले.तर वात्सल्यसिंधु फाउंडेशनच्या माध्यमातुन काम करणा-या उषा वाखारे यांना साविञीबाई पुरस्कार देण्यात आला.नलिनी जयवंत तावरे यांना राजमाता जिजाउ पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी वारसा फाउंडेशनच्या संस्थापिका प्राची दुधाने म्हणाल्या कि,जिजाऊ व सावित्री यांच्या संस्कराची समाजाला खरी गरज असुन जुन्या रूढी परंपरा यांना फाटा देऊन नविन विचार आत्मसात केले पाहिजेत.या कार्यक्रमापुर्वी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मिरवणुक काढण्यात आली.यावर घोड्यावर बसलेले बाल शिवबा व जिजाऊ हे सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते.

या प्रसंगी जि.प.पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष अर्चना शहा,भुमाता ब्रिगेडच्या दुर्गा शुके,स्वाती शिंदे, राज्य ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य पांडुरंग थोरात,निवृत्त प्रबंधक रामदास आंधळे,पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे,विक्रांत थोरात,नगरसेविका मनिषा कालेवार,रोहिणी बनकर,सुरेखा शितोळे,सुनिता कुरुंदळे आदींसह आदिशक्ती महिला मंडळ,रामलिंग महिला उन्नती संस्था,युवा स्पंदन,वैभवी महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुश्री थोरात यांनी केले,सुञसंचालन वर्षा नारखेडे यांनी केले तर आभार अलका ढाकणे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या