घोडनदी न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

Image may contain: 8 people, people smiling, people standing and suitशिरुर,ता.१७ जानेवारी २०२०(प्रतिनीधी) : घोडनदी न्यायालयाच्या आवारात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.घोडनदी न्यायालयाच्या आवारात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मंगळवार (दि.७) रोजी न्यायालयातील सर्व वकील बांधवांसाठी मराठी स्वाक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या.बुधवार (दि.८) रोजी बाल व्याख्याते शंतनू धावडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरिञावर व्याख्यान झाले.गुरुवार(दि.९) रोजी किर्तनकार सारंग दंडवते, दादाभाउ तांबे, शरद रुपनर यांनी मराठी संगीत मैफील सादर केली.शुक्रवार (दि.१०) रोजी सोमनाथ चौधरी व महाबली मिसाळ,रूपाली साळवे,अॅड.दिलीप कांबळे यांनी काव्यवाचन सादर केले.सोमवार(दि.१३) रोजी ज्ञानेश्वर कवाद यांचे मराठी भाषा (ज्ञानेश्वर महाराजांपासून ते आज पर्यंत) या विषयावर व्याख्यान झाले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोपा निमित्ताने (दि.१४)रोजी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गोलेगाव व ढोक-सांगवी येथील जि.प.शाळेतील लेझीम पथकासह शिक्षक व पारंपारिक वेशभुषेत विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती  होती.घोडनदी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.आर.बांदल मॅडम, सहन्यायाधीश आर.डी.हिंगणगावकर, सहन्यायाधीश के.एम.मुंढे,घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष सयाजी गायकवाड यांसह न्यायालयातील सर्व वकिल या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या