संपत कारकुड यांची कार्यकारी संपादकपदी नियुक्ती

Image may contain: 1 person, closeup
शिरुर, ता. १८ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): सादलगाव (ता.शिरुर) येथील पत्रकार संपत सदाशिव कारकुड यांची www.shirurtaluka.com या News वेबसाईटच्या कार्यकारी संपादकपदी नुकतीच निवड करण्यात आली.मुख्य संपादक तेजस फडके यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

संपत कारकुड यांनी सकाळ पेपर्स ५९५ बुधवार पेठ, पुणे-१ येथे ७ वर्ष फोटोकंपोज विभागात काम केलेले आहे.पत्रकारीता क्षेत्रातला त्यांना दिर्घकाळ अनुभव असुन त्यांनी ३ वर्ष दै.पुण्यनगरी,५ वर्ष साप्ताहिक समाजसत्ता या वृत्तपत्रात काम केले आहे.तसेच www.shirurtaluka.com या वेबसाईटच्या सुरवातीपासुन गेले ९ वर्ष ते www.shirurtaluka.com चे प्रतिनिधी म्हणुन काम करत आहेत.त्यामुळे त्यांची कार्यकारी संपादक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

संपत कारकुड हे शिरुर तालुक्यात निर्भिड पत्रकार म्हणुन ओळखले जातात.त्यांनी आपल्या लेखणीतुन अनेक सामाजिक,राजकीय विषयांवर लिखाण केले असुन सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर सांगितले.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या