सादलगाव येथील गावठाण भूखंड पुढाऱ्यांनी लाटले...

सादलगाव,ता. १९ जानेवारी २०२० (संपत कारकूड): सन १९८० सालापर्यंत ग्रामपंचात रेकॉर्डवर ग्रामपंचातच मालकीची ४५ x १०० म्हणजे ४ गुंठे जागा सन १९९० मध्ये झालेल्या सिटी सर्व्हरला हाताशी धरून खासगी मालकीची केली असल्याचा प्रकार सादलगाव येथे माहिती अधिकारात उजेडात आला आहे.भूमी अभिलेख यांच्याकडून ग्रामपंचात सादलगाव गावठाण हद्दीमधील सिटी सर्व्ह क्रमांक ३१३ ची नुकतीच मोजणी करण्यात आल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.

शासनाकडून १९८०  मध्ये घरकुल योजना शर्तीवर गावातील १२ भूमिहीनांना प्रत्येकी १ गुंठा म्हणजे ३३ x ३३ जागा निरंतर वापरासाठी दिल्या होत्या.या जागा कागदोपत्री बरोबर दिल्या परंतु सर्वच जागा सिटी सर्व्हरने आपल्याकडील रेकॉर्डवर घेतल्या नाहीत.सिटी सर्व्हे होण्यापूर्वी मोकळ्या व बक्खळ स्वरूपात असणाऱ्या या जागा आपल्याच असल्याचे तोंडी सांगून कोणतेही मालकीहक्क पुरावे न देता तत्कालीन गावकारभारी यांनी जमेल तशा पद्धतीने आपले नातेवाईक अथवा हितसंबंध असलेल्या व्यक्तीच्या व काही ठिकाणी आपल्या भाऊबंदकीच्या नावावर लावल्या आहेत.

आता याच जागा गावात मोठा वादाचा विषय होत आहेत.विशेष म्हणजे शासनानी घरकुलासाठी दिलेल्या जागेमध्येच बोगस नाव दाखल करून लाटलेल्या जागेची मोजणी केल्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.सिटीसर्व्हेपर्यंत अत्यंत पद्धतशीरपने पक्के काम केलेमुळे याला कोणीच आव्हान देणार नाही अशी खात्री होती.तसेच पुढे येऊन कोण वाईट होणार...? हाच फायदा या बोगसगिरीमध्ये घेतल्याचे दिसून येते.१ गुंठा जागा मिळालेल्या गावातील गरीब व भूमिहीनांना  मात्र जागा दुरुस्त करण्याच्या त्रासाला सामोरे जाण्याची नाहक वेळ आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या