विज दरवाढीचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांना नको

मुंबई,ता.२० जानेवारी २०२० (प्रतिनिधी): वीज दरवाढीचा सर्वसामान्य जनतेवर बोजा पडणार नाही यापद्धतीने नियोजन करण्याच्या सुचना राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या मुंबई येथे आयोजित बैठकीप्रसंगी दिले.विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दरात दिली जाणारी सवलत यापुढेही सुरु ठेऊन राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल,असेही ना. डॉ. राऊत यांनी सांगितले.

वीजदर ठरविण्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य वीज नियामक आयोगाची आहे.वीजहानी कमी करण्यासाठी कठोर प्रयत्न करा.वीजचोरीच्या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही असे सांगून डॉ. राऊत पुढे म्हणाले की,कृषीपंपांकडील थकबाकी वसुलीसाठी सहकार्य करण्याचे पत्र सर्व जिल्हयांचे पालकमंत्री आणि सोबतच सर्व आमदारांना दिल्या जाईल, असेही सांगितले. परदेशी बनावटीच्या ऊर्जा उपकरणांच्या दर्जाची उपकरणे भारतातील कंपन्यांनी तयार करावीत.यासाठी अभ्यासपुर्ण सुचना या उत्पादकांना करून त्यांना प्रोत्साहित करावे.वीज निर्मिती करणा-या भागातील वीजदर कमी करण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

या बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी पॉवर पॊईंट सादरीकरणाच्या माध्यमातून महावितरणच्या एकूण कार्याची माहिती दिली.या बैठकीला (संचालक संचालन),दिनेशचंद्र साबू (संचालक वाणिज्य),सतिश चव्हाण(संचालक प्रकल्प),भालचंद्र खंडाईत (संचालक वित्त) जयकुमार श्रीनिवासन यांचेसह कार्यकारी संचालक व मुख्य अभियंते उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या