शिरुर बाजारसमितीत कांद्याची आवक वाढली; उच्चांकी भाव...

Image may contain: foodशिरुर, ता.२१ जानेवारी २०२०( प्रतिनीधी) : शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याची मोठया प्रमाणावर आवक होत असून रविवारी झालेल्या लिलावात  चांगल्या कांद्यास सुमारे ४००० ते ५,२०० रुपये प्रती क्विंटल या प्रमाणे उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती बाजारसमितीचे सभापती शशिकांत  दसगुडे यांनी दिली.

शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीचा कांद्याचा बाजार नवीन मार्केट येथे भरत असुन दर बुधवारी,शुक्रवारी व रविवारी कांद्याचा जाहिर लिलाव पार पडत असतो.शिरुर,पारनेर,श्रीगोंदा या तीन तालुक्याला अत्यंत जवळची बाजारपेठ व कमी खर्चाचे मार्केट म्हणुन शिरुर बाजारपेठेची ख्याती असल्याने या बाजारपेठेत शेतक-यांची मोठी गर्दी होत असते.वाहतुक खर्च व वेळेची मोठी बचत होत असल्याने या भागातील कांद्याची या बाजारपेठेत मोठी आवक होत असुन रविवार (दि.१९) रोजी शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीत सुमारे ११ हजार ७०० पिशव्यांची आवक झाली असुन चांगल्या कांद्यास सुमारे ४००० ते ५,२०० रुपये प्रती क्विंटल या प्रमाणे उच्चांकी भाव मिळाला.

शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीने मार्केट यार्डवरच शेतक-यांचा कांदा उतरविण्यासाठी शेड, लाईट, स्वच्छतागृह, सी.सी.टी.व्ही यांसह आवश्यक त्या पायाभुत सुविधा उभारलेल्या आहेत.पुणे व अहमदनगर,नाशिक जिल्ह्यामध्ये गरवा जातीचा डबल पत्ती असणा-या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.हा कांदा टिकाउ असुन त्यास चांगली मागणी असते. यार्डवरील कांदा कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडु, प.बंगाल, झारखंड, आसाम आदी राज्यांमध्ये विक्रीसाठी नेला जातो.

याबाबत  बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले कि, शेतक-यांनी पिकविलेला शेतमाल यार्डवरच विक्रीसाठी आणावा.शेतावर जर शेतमाल विक्री केला तर त्यांची वजन व बाजारभावात फसवणुक होउ शकते.तसेच शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतक-यांना मिळु शकत नाही. त्यासाठी बाजारसमितीच्या नवीन मार्केट यार्डवर दर बुधवारी, शुक्रवारी व रविवारी कांदा विक्रीसाठी आणावा असे आवाहन दसगुडे यांनी केले आहे. शेतमाल वाळवुन, निवडुन, गुलटी-दुभळका अशा प्रकारे वेगवेगळ्या बारदाण्यात प्रतवारी करुन आणावा असे बाजारसमितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे व सचिव अनिल ढोकले यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या