चौकीसमोरून दानपेटी पळवणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद

Image may contain: sky, cloud and outdoor
सणसवाडी, ता. 23 जानेवारी 2020: पुणे-नगर महामार्गावर असलेल्या सणसवाडी येथील मुख्य चौकात असलेल्या श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी भरदिवसा उचलून नेली. दानपेटी चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे मंदिराजवळच असलेल्या पोलिस चौकीसमोरूनच चोरट्याने दानपेटी पळविली.

सणसवाडीमधील अत्यंत गजबजलेल्या चौकात सणसवाडी ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज; तसेच हनुमानाचे मंदिर उभारले आहे. या मंदिराशेजारीच शनी महाराज व जोगेश्वरी मातेचीही मंदिरे आहेत. दररोज सकाळ सायंकाळी येथे आरती होते. मंदिरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमरे असून, मंदिराच्या आवारातच पोलिस चौकी आहे. अशा स्थितीत मंदिरातून भर दुपारी अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दानपेटी हातात उचलून पोलिस चौकीसमोरून जात सहाआसनी रिक्षात बसून पळून गेला.


दरम्यान, पुजारी सोमनाथ गाडे यांनी याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी तत्काळ मंदिरात पाहणी केली. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या