...म्हणून राजू शेट्टी यांनी घातले विठ्ठलाला साकडे

Image may contain: 1 person, eyeglasses, closeup and indoor
पंढरपुर, ता. २४ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज विठ्ठलाला साकडे घातले.

महाविकास आघाडीने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, असे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पाळावं ही आठवण करण्यासाठी व त्यांना तशी सुबुद्धी देण्यासाठी पंढरपूरमध्ये आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी येऊन सर्व कार्यकर्त्यांसहित विठ्ठलाचे दर्शन घेतले व साकडे घातले.

मागील दोन वेळा विठ्ठलाला साकडे त्यांनी घातले होते आणि त्यांच्या त्या मागण्या तत्कालीन सरकारने पूर्ण केल्या होत्या.याची आठवण राजू शेट्टी यांनी करून दिली म्हणून आज तिसऱ्यांदा विठ्ठलाला साकडे घातले आहे व सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना विठ्ठलाला केली आहे.तसेच शेतकरी पूर्ण कर्जमुक्त व्हावा, सरकारला जर का सुबुद्धी झाली नाही,तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून संघर्षासाठी तयार आहे, असा इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या