शिरुरच्या पञकारांनी दिली अनाथांना 'मायेची उब'

Image may contain: 3 people, people standingशिरुर, ता. २४ जानेवारी २०२०(प्रतिनीधी) : प्रचंड कडाक्याची थंडी,एवढ्या थंडीत  बसस्थानकात कुडकुडणारे ते जीव, अन अचानक कुडकुडणा-या जीवांना मिळालेल्या उबदार कपड्यांनी माञ सर्वच भारावून गेले.

गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. नेहमीच वेगवेगळे विधायक उपक्रम राबविणा-या शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय बारहाते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन थेट बसस्थानकात कुडकुडणा-या अनाथांना मदत करण्याचे ठरविले. त्यासाठी पत्रकार संघाचे समन्वयक पोपटराव पाचंगे, उपाध्यक्ष धनजय गावडे, पत्रकार प्रशांत मैड यांसह सदस्यांनी पुढाकार घेतला.त्यानुसार गुरुवारी (दि. २४) राञीच्या सुमारास शिरुर बसस्थानकात शिरुरच्या पत्रकार बांधवांनी जाउन थेट  निराधार असलेल्या गरीब, गरजु, अनाथ लोंकाना थंडीपासुन बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट (चादर)चे वाटप करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय बारहाते, शहराध्यक्षा दिपाली काळे, संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर, माजी अध्यक्ष मुकुंद ढोबळे, जेष्ठ पत्रकार मदन काळे आदि उपस्थित होते. यावेळी अचानक मिळालेल्या मायेच्या उबेने माञ सर्वच भारावुन गेले.यावेळी उपस्थितांनी पञकार बांधवांचे आभार मानले.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या