भुमी अभिलेखच्या चुकांमुळे सरकारी मोजण्या वादग्रस्त...

शिरूर, ता. २५ जानेवारी २०२० (संपत कारकूड) : शिरुर येथील भूमी अभिलेख  कार्यालयामध्ये शासनाची फी भरून होणाऱ्या अनेक  मोजण्या सध्या वादग्रस्त ठरत आहेत. मोजणी करताना टिपण व फाळणी चा आधार घेऊनच मोजणी करणे बंधनकारक असताना केवळ गाव नकाशा घेऊन मोजणी केल्यामुळे अनेक मोजण्या वादग्रस्त झाल्या असून, नागरीकांना न्यायालयाचा रस्ता धरावा लागला आहे.

शिरुर येथील भूमी अभिलेखच्या कार्यालयामधून मोजणी करून घेतलेली बहुतांश प्रकरणे  हि न्यायप्रविष्ट होत असून याला भूमी अभिलेखने केलेल्या चुकाच  कारणीभूत आहेत. ग्राउंड लेव्हलला जुडीशिअल कोर्ट म्हणून पहिले जात असलेले शिरुरचे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारीच जमिनीच्या मोजण्या करताना मोठा गोंधळ निर्माण करीत असल्यामुळे मोजणी करूनही समाधान होत नसलयाचे चित्र सध्या येथे पाहावयास मिळत आहे. जमीन एकत्रीकरणाच्या वेळी केलेल्या चुका नागरिक अद्यापही भोगत आहे. हद्दीच्या वादातील मोजणी तर शेतकरी मान्यच करीत नाही. चुकीच्या केलेल्या मोजणीमुळे भाऊबंदकीचे वाद निर्माण होत असून येथील काम करणारे अधिकारी याला कारणीभूत आहेत. 

एका  मोजणीमध्ये कृत्रिम चूक केली कि दुसऱ्या दिवशी शेजारी बांधकरी व भाऊबंद मोजणी ऑफिसाला जातात. एकतर त्यावर हरकत घेतात नाहीतर आपले क्षेत्र मोजून घेणेसाठी पैसे भरतात. शासनाला यामधून भरमसाठ पैसाही मिळतो आहे. या सर्व गोंधळामुळे येथील मोजणी प्रकरणांची संख्या खूप मोठी झाली आहे. मोजणीसाठी कर्मचारी कमी असलयाचे कारण देऊन नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.ऑनलाईन मोजणी फक्त नावापुरतीच आहे का...? पैसे भरून वर्षानुवर्ष गेले तरी मोजणी झाली नाही, अशी अनेक उदाहरणे येथे आहेत.


प्रलंबित प्रकरणाची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेमुळे येथे नागरिकांची गर्दीही जास्त होत आहे. या परिस्थितीचा फायदा येथे काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी आणि एजंट घेत आहेत. यामध्ये अनेक कर्मचारी यापूर्वी लाच घेताना पकडले गेले आहेत. हि वस्तुस्तिथी कोणीही नाकारु शकत नाही.

त्यामुळे शिरुर-हवेलीचे विद्यमान आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी यामध्ये स्वतंत्र लक्ष देऊन होणाऱ्या गैर प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी नागरिंकाकडून होत आहे.
( क्रमश:)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या