तानाजीने केला २०० कोटींचा टप्पा पार

Image may contain: 1 person
मुंबई, २५ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): शुरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित अजय देवगणच्या "तान्हाजी - द अनसंग वॉरिअर" ह्या चित्रपटाने २०० कोटींचा आकडा पार केला आहे.या चित्रपटाने रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर बाजी मारण्यास सुरुवात केली होती."तान्हाजी - द अनसंग वॉरिअर" हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज झाला होता.चित्रपटाचं कथानक ऐतिहासिक असल्याने या सिनेमाच्या ट्रेलरलाच प्रेक्षकांचा भरभरुन  प्रतिसाद मिळाला होता.ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.या चित्रपटाने अवघ्या १५ दिवसात २०० कोटी कमाई करून नव्या वर्षात पहिला विक्रम रचला आहे.

बॉक्स ऑफिसवर यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच 'छपाक' आणि 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' चित्रपटांमध्ये तगडी शर्यत पाहायला मिळाली.तान्हाजीने या शर्यतीतून भरारी घेत बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवायला सुरुवात केली होती.या चित्रपटाने आठवडाभरातच १०० कोटींचा गल्ला जमवला होता.या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही भरघोस कमाई करून २०० कोटींचा आकडा पार केला आहे.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा शुर मावळा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा चित्रपट असल्याने शाळकरी लहान मुलांनाही या चित्रपटाच मोठं आकर्षण आहे.ग्रामीण भागातही हा चित्रपट पाहण्यास मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

हा चित्रपट महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.त्याचाही फायदा या चित्रपटाला झाला आहे.या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकनिष्ठ मावळे तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायला मिळाली.दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगनसह सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोल यांचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये आहे.नववर्षातील हा पहिलाच हिट चित्रपट ठरला आहे.

तान्हाजी - द अनसंग वॉरिअर हा चित्रपट अजय देवगणचा ड्रीम प्रोजेक्ट असून त्याच्या कारकिर्दीतला हा १०० वा चित्रपट होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या