उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा...

Image may contain: 2 people, including Bhau Gawari, eyeglasses
मुंबई, ता. २५ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.राम कोणाच्या मालकीचा नाही.उद्धव ठाकरेंची श्रद्धा रामावर असेल तर त्यात गैर काय आहे...? त्याचा सरकारशी काय संबंध...? असे प्रश्न विचारत आव्हाडांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.

मला वाटत नाही की यामध्ये काय राजकारण करण्यासारखं आहे.ज्याला रामाच्या नावावरुन राजकारण करायचं त्यांचे हे धंदे आहेत.आम्हाला काहीही फरक पडत नसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली.

परंतु त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे.त्याचप्रमाणे राम ही श्रद्धा आहे.मी खंडोबा,कोलकातामधील दुर्गामातेच्या मंदिरात जातो.तुळजापूर,सप्तशृंगीला जातो.देव हा एकच आहे.त्यामुळे ते रामाकडे गेले तर काय फरक पडतो,असंही आव्हाड म्हणाले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या