अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध...

Image may contain: 1 person, eyeglasses and text
मुंबई, ता.२६ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): केंद्र सरकारने मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये,असं मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे.अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मनसेची मागणी आहे,असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

प्रसिद्ध गायक अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. अदनान सामी मूळ भारतीय नागरिक नसल्याचं कारण सांगत मनसेने अदनान सामीचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट केलं आहे.

सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय,तोच आनंदावर थोडं विरजण पडलं. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच 4 वर्षांमध्ये त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असाही सवाल खोपकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आपल्या सरकारकडून कौतुक होणं आणि मान्यता मिळणं हा कोणत्याही कलाकारासाठी सर्वात मोठा क्षण असतो.सरकारने दिलेल्या पद्मश्री पुरस्काराने मी अगदी भारावून गेलो अशल्याचं ट्विट अदनान सामीने केलं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या