रांजणगाव सांडसमध्ये ध्वज वेळेत उतरवलाच नाही...

Image
रांजणगाव सांडस, ता. 28 जानेवारी 2020: रांजणगाव सांडस येथील ग्रामपंचायतीने राष्ट्रध्वज वेळेत न उतरविल्याने राष्ट्रगौरव अपमान प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.


ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी (ता. 26) सकाळी 8 वाजता कार्यालयाच्या इमारतीवर ध्वजवंदन केले. त्यानंतर राष्ट्रध्वज वेळेत उतरविणे गरजेचे होते. मात्र, रात्री 9 वाजण्याच्या सुमारसही राष्ट्रध्वज फडकत होता. त्यामुळे तो गावातील काही मंडळींनी सन्मान देऊन खाली उतरविला. याबाबत ग्रामपंचायत सदस्य महेश रमेश लवांडे यांनी तक्रार दिली. त्यानुसार ग्रामपंचायतीमधील संबंधित अधिकार व कर्मचाऱयांविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, याबाबत पुढील तपास सुरू असून, परिसरात चर्चा रंगली आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या