पंकजा मुंडे यांनी या कारणासाठी केले लाक्षणिक उपोषण...

Image may contain: 4 people, people standing
औरंगाबाद, ता. २८ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): मराठवाडयाला हक्काचे पाणी मिळावे या व अन्य समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व भाजपच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

मराठवाडा सुजलाम् सुफलाम् व्हावा हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न होते.कृष्णा खो-याचं पाणी आणण्याचं काम त्यांनीच केलं.मराठवाड्याच भाग्य उजळावं,इथल्या प्रश्नांची उकल व्हावी,प्रकल्पांना न्याय मिळावा यासाठी सरकारने कॅबिनेटची एक बैठक मराठवाड्यात घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी येथे केली.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढे समाजसेवक म्हणून काम करणार असून जनतेसाठी लढा देणार आहे.तुमच्या मनात माझे स्थान असेच कायम अबाधित ठेवा.त्यावेळी त्या बोलत होत्या.उपोषणात सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यां समोर बोलताना सुरवातीलाच त्यांनी भाजपच्या नेत्यांचे मनापासून आभार मानले.

सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सकारात्मक भावनेतून हे उपोषण केले आहे.हे उपोषण माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी,मराठवाडयातील जनतेच्या पाण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या,मी भाजप सोडणार नाही,अफवांवर विश्वास ठेवू नका.हे उपोषण कोणत्याही पदासाठी किंवा अपेक्षांसाठी नाही,तुमच्या बळावर हे उपोषण करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या