राज्यांतील सोसायट्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार

Image may contain: grass, sky, plant, flower, outdoor and natureशिरुर,ता.२८ जानेवारी २०२०(प्रतिनीधी) : शेतकरी कर्ज कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विविध कार्यकारी सहकारी संस्था (सोसायटी) यांच्या निवडणुका तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात येणार असुन शासनाने तसे परिपञक काढले आहे.सोसायट्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती.

राज्यातील शेतकऱ्यांना गेली 3 वर्षे निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांना सातत्याने तोंड द्यावे लागले आहे.आधी कोरडा दुष्काळ,ओला दुष्काळ,नंतर अवकाळी पाऊस, गारपीट व महापूर यांसारख्या संकटाना सामोरे जावे लागले.त्यामुळे राज्यातील शेतकरी पिके गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे.शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असणाऱ्या गावोगावच्या विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्या आगामी  ३ महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार थकबाकीदार सभासद शेतकरी मतदानास अपात्र होणार आहेत.कर्जमाफीची तांत्रिक तयारी चालू आहे.कर्जमाफी मिळण्यास वेळ जाणार असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत विविध कार्यकारी सहकारी संस्था (सोसायटी) यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी फराटे यांनी मुख्यमंञ्यांकडे समक्ष भेटुन निवेदनाद्वारे केली होती.

याबाबत शासनाने नुकतेच परिपञक काढले असुन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५७ मधील तरतुदीनुसार,शासनास असलेल्या अधिकारात कलम ७३ कक मधील तरतुदीस सुट देउन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था या संस्थांच्या निवडणुका,ज्या प्रकरणी उच्च/सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक घेण्याचे आदेशित केले आहे व ज्या संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेत नामनिर्देशन पञ स्विकारणे सुरु आहे,अशा संस्था वगळुन राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था या संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश परिपञकाद्वारे पारित केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या