Video: प्रेम करणाऱयांना या गाण्याने याड लावलंय...

मुंबई, 29 जानेवारी 2020: बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांचे असंख्य चाहते आहेत. अनेकदा भोजपुरी अल्बम सॉन्गचे व्हिडीओ रिलीज झाल्यावर लगेचच व्हायरल होताना दिसतात. असेच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यात भोजपुरी अभिनेत्री प्रियांका सिंहनं काम केलं आहे. प्रियांकाचं पागल बनाइबे हे गाणं सध्या सोशल मीडियावर एवढं व्हायरल होत आहे की आतापर्यंत तब्बल 15.27 कोटी पेक्षा जास्त लोकांनी हे आयटम सॉन्ग पाहिले आहे.


युट्यूबवर व्हायरल झालेलं हे गाणं खेसारी लाल यादव आणि प्रियांका सिंह यांच्या दबंग सरकार या सिनेमातील आहे. या सिनेमातील सर्वच गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत पण या सिनेमातील प्रियांका सिंहवर चित्रित झालेलं 'पागल बनाइबे' हे गाणं विशेष गाजलं. हा सिनेमा रिलीज होऊन बराच काळ झाला असला तरीही हे गाणं मात्र अद्याप पाहिले जात आहे.भोजपुरी सिनेमांच्या स्टार्ससोबतच भोजपुरी गाण्यांचाही वेगळा चाहता वर्ग आहे. ही गाणी बराच काळ लोकप्रिय राहतात. खेसारी लालाचं आणखी एक गाणं सध्या युट्यूबवर गाजत आहे. 'मेहंदी लगा के रखना' या भोजपुरी सिनेमातील गाणं 'लगा के फेयर अँड लव्हली' सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे गाणं भोजपुरी अभिनेत्री ऋतु सिंहवर चित्रित करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या