शिरुर पोलीसांकडून महिलेचे दिड तोळयांचे दागिने परत...

Image may contain: 5 people, people standingशिरूर,ता.२९ जानेवारी २०२०(प्रतिनिधी) : तीन महिन्यापूर्वी शिरूर चौफुला मार्गावर वृद्ध महिलेला स्विफ्ट डिझायर मध्ये लिफ्ट देऊन करडे घाटात गाडी थांबून महिलेला मारहाण करून महिलेच्या गळ्यातील दीड तोळे सोने लुटणारा शिरूर तालुक्यातील आरोपी शिरूर पोलिसांच्या स्थानिक तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे व पथकाने अटक करून वृद्ध महिलेचे दीड तोळ्याचे दागिने ही परत दिले आहे.

आशा सुभाष राव (रा.निरा, ता.बारामती) असे दागिने परत  मिळालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.दत्तात्रय गाडे (रा .गुनाट, ता. शिरूर)असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे कि,दि.२० नोव्हेंबर रोजी आशा सुभाष राव या वृद्ध महिलेला आपल्या नीरा गावी जायचे होते. परंतु गाडी निघून गेल्याने त्या खाजगी वाहनाने न्हावरे फाटा येथे आल्या व तेथून खाजगी गाडी पकडून चौफुला व तिथून आपल्या मूळगावी नीरा येथे एसटी बस ने जायचे त्यांनी ठरविले होते. याच वेळेस तेथे स्विफ्ट डिझायर गाडी आली व त्यांनी त्यांना लिफ्ट दिली. स्विफ्ट गाडीमध्ये राव बसल्यानंतर काही अंतरावर कर्डे घाटात गेल्यानंतर गाडी मालकाने गाडी थांबून वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर एकूण दीड तोळ्याचे दागिने घेऊन तो फरार झाला होता. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, संजय जाधव, संजय साळवे या पोलिस पथकाने न्हावरा फाटा येथील सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये गाडीचा अर्धवट भाग व गाडीच्या पुढील भागात असलेला गणपती वृद्ध महिलेने सांगितलेले चोरट्याचे वर्णन यावरून पोलिसांनी तपास करीत अखेर चोरट्याला अटक करून वृद्ध महिलेचे दीड तोळ्याचे दागिने नुकतेच परत केले आहे.


दागिने परत मिळाल्यानंतर आशा राव यांनी,मी नातेवाईकांकडे गेली असताना अशाप्रकारे चोरट्याने मला मारहाण केली होती व मागे सोन्याचे दागिने चोरून नेले होते हे दागिने परत मिळतील त्यांनाही अशा नव्हती परंतु शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांच्यामुळेच मला माझे दागिने मिळाले आहे, त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही अशा भावना व्यक्त केल्या.तर पोलीस खात्यात असताना अनेक गुन्ह्यांची उकल करण्याचा मोठे आव्हान आमच्यापुढे असते परंतु या गुन्ह्यांमध्ये तपास करताना अनेक अडचणी असताना हा तपास पूर्ण झाला. परंतु या तपासात वृद्ध महिलेचे दागिने आम्ही परत देऊ शकलो यातून  महिलेकडून मिळालेले आशीर्वाद लाखमोलाचे असुन यामुळे पुढील काम करण्याचा उत्साह मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी बोलताना दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या