जनगणनेमुळे शिक्षक हक्काच्या सुट्टीला मुकणार...

मुंबई, ता. २९ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): राज्यातील शिक्षकांना मे महिन्याच्या हकाच्या सुट्ट्या मिळणार नसल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.कारण मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नेमणुका देशाच्या जनगणनेसाठी करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्या मे महिन्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात येणार आहेत.शिक्षण अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड येथील जनगणना अधिकारी यांनी तसे पत्र देऊन आदेश दिल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निषेध केला आहे.

आता २०२१ च्या जनगणना सुरु होणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घरांना क्रमांक देणे,गटाची विभागणी करणे, घरयादी तयार करणे ही कामे १ मे ते १५ जून २०२० या कालावधीत केली जाणार आहेत.शिक्षकांच्या रजा त्यासाठी रद्द करुन हे काम करावे लागणार असल्यामुळे वर्षाच्या ७६ पैकी ३९ सुट्ट्यांवर गदा येणार आहे.इतर कर्मचाऱ्यांना हे काम देण्यात यावे,आणि शिक्षकांचा भार कमी करुन त्यांना हक्काच्या सुट्ट्या देण्यात याव्यात,इतर कर्मचाऱ्यांना हे काम देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषेदेने केली आहे.

शिक्षकांना या काळात पेपर तपासणीच्या कामासोबतच दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी पेपर तपासणी करणे आवश्यक असते.पण जनगणनेच्या कामात या काळात शिक्षक व्यस्त राहिला तर शिक्षकांना या कामाचा ताण येऊ शकतो,अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनेकडून मांडण्यात आली आहे.

महापालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या कालावधीत मुख्यालय सोडू देऊ नये अशा सूचना जनगणना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.मुख्यालय सोडण्यास परवानगी दिल्यास त्यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असाही इशारा देण्यात आला आहे.जनगणना अधिकारी यांच्याकडे याबाबत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या