आहेर खरेदीसाठी गेले अन् काळाने घातला घाला...

Image may contain: 1 person, standing
शिरुर, ता. 30 जानेवारी 2020 : शिरुर नगरपरिषदेसमोर ट्रकला धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना बुधवारी (ता. २९) दुपारी घडली.

या घटनेत भानुदास दत्तु इचके (वय.४०, रा.निमगाव भोगी) असे अपघातात दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भानुदास इचके हे रांजणगाव गणपती येथून विवाह समारंभासाठी शिरुर येथे कामानिमित्त आले होते. शिरुर नगरपरिषदेसमोरुन स्वत:च्या बुलेटवरून (एम.एच.१२.एल.यु.२५१८) जात असताना अवजड मालवाहतूक करणा-या ट्रकला धडक बसली. ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. माञ, त्यांना उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. ही घटना भरदुपारी घडल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती कळताच शिरुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने तत्काळ वाहतूक सुरळित केली. याबाबत इचके यांचे चुलत भाऊ अंकुश इचके यांनी शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.अपघातात दुर्दैवी मृत्यु झालेले भानुदास हे निमगाव भोगीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष असून रांजणगाव वसाहतीतील ग्लुटेक मोल्ड प्रा.लि.या कंपनीत ते कामगार युनियनचे अध्यक्ष होते. त्यांच्या चांगल्या व मितभाषी स्वभावामुळे ते परिसरात परिचित होते. दुपारी लग्नाच्या आहेर खरेदीसाठी शिरुर येथे आले होते, माञ त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या मागे वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. निधनाची वार्ता समजताच निमगाव भोगीसह शिरुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे....बळी गेल्यानंतर ढिम्म प्रशासन खडबडून जागे झाले

शिरुर शहरात वाहतुक कोंडी हि नित्याचीच झाली आहे. याबाबत www.shirurtaluka.com ने सातत्याने आवाज उठविला होता. त्याचबरोबर नागरिकांनीही सातत्याने वाहतूक कोंडीबाबत नगरपरिषद व पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे वाहतूक कोंडीबाबत लक्ष वेधले होते. माञ, गेल्या काही वर्षात नगरपरिषद प्रशासनाकडुन ठोस कुठलीच उपाययोजना करण्यात येत नव्हती. पोलिस प्रशासनही वाहतूक कोंडीकडे फारसे गांभिर्याने लक्ष देत नव्हते. माञ, दुपारी घटना घडल्यानंतर नगरपरिषद प्रशासन व पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. नगरपरिषदेजवळील परिसरात प्रशासनाने तातडीने कारवाई सुरु केली होती. यावेळी अतिक्रमणे हटविण्यात येत होती. शहरातील बसस्थानक ते बी.जे कॉर्नर या रस्त्यावरील वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस तसेच नगरपरिषद व एस.टी स्टॅंड परिसरात न भुतो न भविष्यती वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे असून, अन्यथा पुन्हा एखादा निष्पाप बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होऊन कारवाईचा फार्स दाखविणार काय? असा सवाल शिरुर शहरातील संतप्त नागरिकांनी केला आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या