तान्हाजी नंतर अजयचा कोणता आहे नवीन सिनेमा...

Image may contain: 2 people

मुंबई, ता. ३० जानेवारी २०२० (प्रतिनिधी): सध्या बॉक्स ऑफिसवर एकच चित्रपट धमाल करत आहे,तो म्हणजे तान्हाजी हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट.आता तान्हाजीनंतर अजय देवगन फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित असलेला 'मैदान'चित्रपट घेऊन येत आहे.

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगनच्या मुख्य भूमिकेत असलेल्या तान्हाजीने दोनशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे.चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना होत आला आहे,अजूनही तान्हाजीची क्रेझ कायम आहे.तान्हाजी नंतरच्या मैदान या सिनेमाचे दोन पोस्टर्स आज प्रदर्शित करण्यात आले आहे.

मैदान या चित्रपटात अजय देवगन एका शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे दिसत असून पायाने फुटबॉलला किक मारतांना दिसत आहे.मैदानचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्माने केले आहे.अजय देवगणने सहाय्यक दिग्ददर्शक म्हणून काम करत आहेत.२७ नोव्हेंबर २०२० ला मैदान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या