आमदार सुनिल शेळके युवा मंचने केली ही मागणी...


तळेगाव दाभाडे, ता. ३० जानेवारी २०२० (प्रतिनिधी): युनियन बँक ऑफ इंडिया,तळेगाव दाभाडे शाखेच्या विविध कागदपत्रांवर तळेगाव दाभाडेचा उल्लेख तालेगाव दबाडे असा करण्यात आलेला आहे.यामध्ये त्वरित सुधारणा करून तळेगाव दाभाडे असा उल्लेख दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी आमदार सुनील अण्णा शेळके युवा मंचातर्फे करण्यात आली आहे.


भारताच्या इतिहासात पहिल्या महिला सरसेनापती म्हणून सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांनी कारकीर्द गाजविली.याचा ऐतिहासिक वारसा तळेगाव दाभाडे शहराला लाभलेला आहे.आमदार सुनील अण्णा शेळके युवा मंचच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आज,गुरुवारी युनियन बँक ऑफ इंडिया,तळेगाव दाभाडे शाखा येथे लेखी निवेदन देण्यात आले.

श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्यानंतर सरसेनापती उमाबाई साहेबांनी स्वराज्याची लष्करी धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आणि या इतिहासाचे प्रतीक म्हणजे संपूर्ण गाव तळेगाव दाभाडे म्हणून नामकरण होऊन सुप्रसिद्ध झाले.युनियन बँकेतील तळेगाव शाखेतून होत असलेल्या व्यावहारिक पत्रव्यवहारातील चेकबुक,पासबुक,बँक स्टेट्मेंट व नानाविध कागदपत्रांवर तालेगाव दबाडे असा उल्लेख असून तो तळेगाव दाभाडे असा दुरुस्त करण्यात यावा अशी विनंती या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

अपेक्षित बदल पुढील महिन्यात व्हावेत अशी मागणी करण्यात आलीय.यावेळी गोकुळ किरवे,दिनेश दरेकर,सागर खोल्लम,प्रतिकेत म्हाळसकर,आकाश ठोंबरे,योगेश मोरे,नबिलाल आत्तार,अक्षय भोकरे,योगेश जांभूळकर उपस्थित होते.तरीही या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण कायमस्वरूपी रहावे यासाठी आपण इतिहासाच्या या दुरुस्तीसाठी मुदतीत बदल करणे अपेक्षित आहे.असे या निवेदनात म्हटले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या