...म्हणून अशोक सराफ दोन बटणं उघडी ठेवायचे

Image may contain: 2 people
मराठी चित्रपट सृष्टीतील बादशहा म्हणजे अशोक सराफ. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी अधिराज्य गाजवले. पण, चित्रपटांमध्ये भूमिका साकार करताना शर्टची पहिली दोन बटने नेहमी उघडी दिसायची. यामागे एक कारण असून, त्यांनी प्रथमच ते दिले आहे...

एका वृत्तवाहिनीशी बोलताना अशोक सराफ म्हणाले, सुरूवातीच्या काळात जेव्हा त्यांनी त्यांच्या करिअरला सुरूवात केली तेव्हा शर्टाचे पहिले दोन बटणं उघडे ठेवायची फॅशन होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलर पर्यंत शर्टाचे बटणं लावले की अवघडल्यासारखेही व्हायचे. त्यामुळे कॉलरपर्यंत बटण न लावत ते असेच मोकळे ठेवणे जास्त मोकळेपणाचे वाटायचे म्हणून त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये शर्टाचे पहिले दोन बटण उघडेच ठेवायचो.

अशोक सराफ यांचा 4 जून 1947 रोजी मुंबईत जन्म झाला. दक्षिण मुंबईमधील चिखलवाडी येथे त्यांचे बालपण गेले. डीजीटी विद्यालय मुंबई येथे त्यांनी शिक्षण घेतले. अभिनेत्री निवेदीता सराफ यांच्याशी त्यांनी विवाह केला असून, त्यांना एक मुलगा आहे. अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे व अशोक सराफ यांची जोडी होती. त्यांनी चित्रपटसृष्टीला मोठे योगदान दिले. सरिकांना खळखळून हसवले आहे.

 


चित्रपटसृष्टीत येण्याआधी एका बँकेत ते काम करत होते हे खूपच कमी जणांना माहिती आहे. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं त्यांनी बँकेत काम केले. ते म्हणाले, मी १९७४ ला पहिला चित्रपट केला. पण त्यानंतरही मी बँकेत नोकरी करणे सोडले नव्हते. चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला बँकेत जाणे जमायचे नाही. १९७८ ला तर संपूर्ण वर्षभर मी बँकेत गेलोच नव्हतो. मला बरे नाही असे सांगत मी मेडिकल सर्टिफिकेट दिले होते. काही महिने ऑफिसला गेलोच नसल्याने माझ्या ऑफिसमधील काही वरिष्ठ मंडळी घरी आली. मी त्यावेळी घरी नव्हतो. माझ्या बहिणीने दरवाजा उघडला. मी कुठे आहे असे तिला विचारले असता मी कोल्हापूरला गेलो असल्याचे तिने सांगितले. अखेर माझ्यामुळे माझ्या सहकाऱयांना त्रास होत आहे असे मला वाटल्याने मी नोकरी सोडली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या