पिंपरी चिंचवड येथे संभाजी राज्यांचा पुतळा उभारणार...


पिंपरी चिंचवड, ता. ३१ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे.पुतळ्याची उंची १४० फूट एवढी असेल.शहराच्या तमाम तरुणांना प्रेरणा देणारे ते शिल्प ठरेल,असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.


छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेतले तरी तरुणांमध्ये एक वेगळी उर्जा येते.भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवांजली मंचच्या वतीने संयोजिका पूजा लांडगे यांनी भोसरी येथे आयोजित केलेल्या इंद्रायणी थडीचे उद्‌घाटन गुरुवारी (दि.३०) माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी फडणवीस बोलत होते.या शिल्पाच्या उद्‌घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही यावे अशी आमची अपेक्षा असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या