दोन तळीरामांचा मतिमंद महिलेवर अत्याचार...

No photo description available.
कोपरगाव, ता. ३१ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): शहरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय मतिमंद महिलेवर दोन तळीरामांनी अत्याचार केले.या दोघा तळीरामांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली.पीडित महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.मिळालेली अधिक माहिती अशी आहे की, आज शहरात सायंकाळी चार वाजल्या दरम्यान जालिंदर कचरू त्रिभुवन (वय ३५) व नवनाथ मच्छिंद्र वाघ (वय ४०) यांनी मद्यधुंद अवस्थेत पीडित महिलेच्या घराशेजारील शेळ्या बांधण्याच्या गोठ्यात घुसून तिच्यावर अत्याचार केला.पीडितेच्या घराच्या जवळच दारूचा अड्डा असून,या अड्ड्यावर आरोपी नेहमी दारू पिण्यासाठी येत असत.त्यामुळे पीडितेवर त्यांची नजर होती

पीडित महिलेच्या नातेवाईकांनी या आरोपींना पाहून आरडाओरडा केला.त्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले. अत्याचार करणाऱ्या नराधमांना नागरिकांनी पकडून चोप दिला.त्यात आरोपी जालिंदर त्रिभुवन याच्या डोक्‍याला जबर मार लागून तो जखमी झाला.नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून दोघांना त्यांच्या ताब्यात दिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या