सृष्टी पगारे हिने छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाला भेट...

Image may contain: 1 personलासलगांव, ता. १ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): काकासाहेब नगर (रानवड कारखाना) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी मालिका 'स्वामिनी' मधील बालपणाची रमाबाई ची भूमिका करणारी सृष्टी पगारे (नाशिक) हिने शाळेला भेट दिली.सृष्टी हिने तिची आई डॉक्टर अपर्णा पगारे वडील डॉक्टर पंकज पगारे यांच्यासमवेत येथील शाळेला भेट दिली.

नाशिक येथे डॉन बॉस्को स्कूल मध्ये चौथीत शिक्षण घेत असणारी सृष्टी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे धडे घेत आहे ते पंडित जगदेव वैरागकर या शाळेतील संगीत शिक्षक आहे.सृष्टीने विद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर 'सुर नवा ध्यास नवा' या संगीत कार्यक्रमातील काही गाण्यांची झलक तर स्वामिनी मालीकेचे टायटल सॉंग विद्यार्थ्यांसमोर गायले.यावेळी तिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिल्यास ध्येयाची प्राप्ती होते..

यावेळी सृष्टीचा सत्कार विद्यालयातील संगीत विभागातर्फे करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भरत पगार,पर्यवेक्षक बाबाजी ढोमसे,संगीत शिक्षक पंडित जगदेव वैरागकर,नारायण दरेकर,भिमराज काळे,हरिओम शंखपाळ,शकुंतला बनकर,त्र्यंबक मेधने,प्रकाश निकम,रमेश तासकर,सूर्यकांत गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर भालेराव यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या