लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रुपाली चाकणकर भडकल्या...

Image may contain: 1 person, smiling
मुंबई, ता. २ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी आपण हिरोईन आणू,व्यासपीठावर बसलेल्या तहसीलदार मॅडमही हिरोईन सारख्या दिसतात,असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केलं होतं.यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली असून लोणीकरांना चांगलंच झापलं आहे.

सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही.त्यामुळे बोलताना जरा भान ठेवा आणि काही वक्तव्य करताना जबाबदारीने करा,असं म्हणत चाकणकर यांनी लोणीकरांना धारेवर धरलं आहे.लोणीकरांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.मी बोललो ते काहीही चुकीचं नसल्याचं स्पष्टीकरण लोणीकरांनी दिलं आहे.
   
बबनराव लोणीकर,जीजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच.याची काळजी तुम्ही करु नका,पण तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साप करायला आम्हाला वेळ लागणार नाही,असं म्हणत चाकणकर यांनी इशारा दिला आहे.चाकणकरांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला असून'आता दाखवू तुम्हाला हिरोईन कशा असतात'असं क‌ॅप्शन दिलं आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या