जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग...

Image may contain: text

पिंपरी चिंचवड, ता. ३ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करून गैरवर्तन करणा-या एकाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे.किशोर दामू कु-हाडे (रा.वडगाव रोड,आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेने आरोपीला विरोध केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन धक्काबुक्की केली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिला त्यांच्या किराणा दुकानात असताना आरोपी तिथे आला.त्याने फिर्यादी यांना लग्नाची मागणी घालून त्यांच्याशी गैरवर्तन केले.

तसेच त्या दुकानातील बरण्या फेकून दिल्या.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.याबाबत आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या