हिंगणघाट येथे या कारणावरून बंद पुकारण्यात आला...

Image may contain: text
वर्धा, ता. ४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कामावर जाणाऱ्या प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याची धक्‍कादायक घटना घडली होती.पीडित तरुणी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे.सोमवारी ती कामासाठी निघाली.हिंगणघाटच्या नंदोरी चौकामध्ये ती बसमधून उतरली.त्या ठिकाणावरुन ती महाविद्यालयाकडे चालत जात होती.त्याच दरम्यान आरोपी दुचाकीवरुन मित्रासोबत आला.त्याने दुचाकीमधून एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल काढले आणि तरुणीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले.


या घटनेमध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली.तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.विकीपीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करतो.त्याचे लग्न झालेले असून तो पीडित तरुणी ज्या गावात राहते त्याच गावात आरोपीही राहतो.एकतर्फी प्रेमातून आरोपीने पीडित तरुणीला जिवंत जाळले होते.पीडित तरुणीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली.याप्रकरणी पोलिसांनी विकेश उर्फ विक्की नगराळे याला नागपूर येथून अटक केली.या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि सर्वपक्षियांनी आज हिंगणघाट बंदची हाक दिली आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा घटनेची निंदा केली असून पोलिस अधिक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.या प्रकरणाविरोधात हिंगणघाटमध्ये मंगळवारी सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या