...त्या महिला सुखद धक्क्याने गेल्या भारावुन

Image may contain: 19 people, outdoorशिरूर,ता.४ फेब्रुवारी २०२०(मुकुंद ढोबळे) : नदीकडील जगणे...चिखलाने माखलेले हात कष्ट करण्यात मग्न... ना कुठल्या सणाची उत्कंठा... ना हळदी-कुंकवाचं महत्व... केवळ आणि केवळ संसाराचा गाडा ओढण्याचे व कष्ट करण्याची घाई... अशा वीटभट्टी कामगार महिलांना आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने पाठीवर हात ठेवत हळदी कुंकू चे महत्व पटवून देत वाण म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले.या अनपेक्षित सुखद धक्क्याने महिला भारावुन गेल्या होत्या.

चिखलाने माखलेल्या हातांनाही हळदी-कुंकू कार्यक्रमात सामावून घेतले गेले.यामुळे शहरातील हळदी-कुंकवाच्या थाटापेक्षा वीट भट्टीवरील हळदीकुंकू कार्यक्रमांनी वेगळी ऊंची गाठली होती. तर वीटभट्टी कामगार महिला या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने अक्षरशः भारावून गेल्या होत्या.

शिरूर येथील आदिशक्ती महिला मंडळाच्यावतीने शिरूर,गोलेगाव तालुका शिरूर येथील वीट भट्टी कामगारांच्या घरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला.शिरूर येथील आदिशक्ती महिला मंडळाचे अध्यक्ष शशिकला काळे व त्यांच्या सहकारी महिलांनी गेली चार वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम आजही चालू ठेवला असून गोळेगाव तालुका शिरूर व शिरूर येथील वीट भट्टी महिला कामगारांना साठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी शशिकला काळे, सुनंदा लंघे ,उषा वाखारे मनिषा कालेवार सुवर्णा सोनवणे लता नाजिरकर शिला पांचगे,जयश्री थेऊर,अनघा पाठक,नुतन भाटी,वैशाली मुथ्था ,निता सतेजा ,राजश्री शेजवळ,मनिषा तरटे, सविता बोरूडे व वीट भट्टी वरील कामगार महिला उपस्थित होत्या.

आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे म्हणाल्या कि,साडीचोळी,साखर, चहापावडर, साबण, शँपु, कँलेंडर अशा रोजच्या दैनंदिन लागणा-या अनेक गोष्टींचे वाटप करण्यात आले तसेच लहानमुलांना खाऊ वाटप करण्यात आले.सामाजिक भावनेतून गेली चार वर्षापासून आम्ही कष्टकरी कामगार महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरु केला असून यासाठी आदिशक्तीच्या सर्व महिला मदत करत असतात त्यातूनच सामाजिक बांधिलकी ठेवून वीटभट्टी कामगार महिलांना सोबत घेतले असुन असे उपक्रम यापुढेही सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या