'बागी ३'या चित्रपटाचे पोस्टर रिलीज...

Image may contain: one or more people and textमुंबई, ता. ४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): अभिनेता टायगर श्रॉफ आता 'बागी ३' या चित्रपटातून पुन्हा अ‍ॅक्शन सीन करण्यासाठी तयार आहे.अभिनेता टायगर श्रॉफच्या या चित्रपटाचा पोस्टर निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.हे शेअर करताना लिहिलं की,'आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या विरोधात त्याची आतापर्यंतची सर्वात मोठी लढाई.

'बागी ३'च्या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ रनगाडासमोर उभा असलेला दिसत आहे.तसंच त्याच्या हातात रायफल दिसतं आहे.या पोस्टरने सर्वांची मनं जिंकली आहेत.या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.'बागी ३' या चित्रपट ६ मार्चला प्रदर्शित होणार असून यामध्ये टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

एका राष्ट्राच्या विरोधात उभा राहणार बागी.रॉनी परत आला आहे.बागीचा ट्रेलर ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.'चाहत्यांना आता बागीचा ट्रेलर पाहण्यासाठी तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.या चित्रपटात आकर्षित करणारे अ‍ॅक्शन सीन असणार आहेत.या चित्रपटाची निर्मिती नाडियाडवाला आणि अहमद खान यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या