नागराज मंजुळेंच्या आणखी एका कलाकृतीचा गौरव...

Image may contain: 1 person, smiling, beard

मुंबई, ता. ४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): 'सैराट', 'फँड्री' अशा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या आणखी एका कलाकृतीचा गौरव करण्यात आला आहे.१६व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांचा 'पावसाचा निबंध' हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे.मुंबई फिल्म्स डिव्हिजन नेहरु सेंटरमध्ये पार पडलेल्या महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात त्यांना गौरवण्यात आलं.

नागराज मंजुळे यांच्या या लघुपटाला 'रौप्य शंख' देत पुरस्कृत करण्यात आलं.मुख्य म्हणजे नागराज मंजुळे यांच्या यापूर्वीच्या लघुपटालाही राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.या खास कार्यक्रमाला राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती.चित्रपटांच्या दिग्दर्शनाच महारथ असणाऱ्या मंजुळे यांचा हा दुसरा लघुपट.यापूर्वी त्यांनी,पिस्तुल्या हा लघुपट साकारला होता.

पावसाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन पावसाचा निबंधामधून देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे पावसाचा निबंधाचीही राष्ट्रीय पुरस्कारांवर वर्णी पाहायला मिळाली.बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचा हा लघुपट दाखवण्यात आला आहे. नागराज मंजुळे येत्या काळात हिंदी कलाविश्वातून एका नव्या चित्रपटासह आणि तितक्याच नव्या कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.'

झुंड' या आगामी चित्रपटावर ते सध्या लक्ष केंद्रीत करत आहे.या चित्रपटातून बिग बी,अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिका साकारत आहेत.महानायकासोबत काम करण्याची मंजुळे यांची ही पहिलीच वेळ असल्यामुळे प्रेक्षक आणि इतर कलाकारही त्यांच्या या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या