मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र...

Image may contain: 1 person, smilingमुंबई, ता. ५ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): जिथे भाजपची सत्ता नाही तिथे अस्थिरता निर्माण करायची,दंगे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचं याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का?,असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

माझं हिंदु राष्ट्र त्याची व्याख्या वेगळी आहे.माझ्या वडिलांनी शिकवलेलं हे हिंदुत्व नाही.माणसं माणसाला मारतील हे हिंदुत्व नाही,असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवून किंवा दुरूपयोग करून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही,असं म्हण त उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

हे हिंदुत्व नसेल तर मी कुणापासून फारकत घेतली.हे माझे समविचारी आहेत काय? धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदूत्व नाही,अजिबात नाही.हे हिंदुराष्ट्र मी मानणार नाही,असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.ते 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या