पंतप्रधान मोदींवर या कारणावरून राहुल गांधीचं टीकास्त्र...

Image may contain: 2 people, including Bhau Gawariनवी दिल्ली, ता. ५ फेब्रुवारी २०२० : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.'नरेंद्र मोदींनी सर्व काही विकायला काढलं आहे.एवढंच काय मनात आलं तर उद्या ते ताजमहालही विकतील'अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा,काँग्रेस आणि आपने जोरदार तयारी सुरू केली आहे.विधानसभेसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून,११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.दिल्लीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.तसेच भाजपाचे काही नेते देशभक्तीबाबत बोलतात.पाकिस्तानच्या नावाने खडे फोडत आहे

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली आहे.ही घोषणा खूपच लोकप्रिय झाली आहे.इंडियन ऑईल,एअर इंडिया,हिंदुस्थान पेट्रोलियम,रेल्वे, लाल किल्ला हे सर्व ते विकायला निघाले आहेत.राहुल गांधी यांनी भाजपासह आम आदमी पार्टीवरही टीका केली आहे.तसेच पाकिस्तानात जाऊन भारतमाता की जय म्हणण्याची हिंमत दाखवणारा एक तरी भाजपाचा नेता दाखवा,असं आव्हान देखील राहुल गांधी यांनी दिलं आहे.

आप आणि भाजपा हे दोन्ही पक्ष काम करत नाहीत तर यांचा भर हा केवळ मार्केटिंग करण्यावर असतो.नरेंद्र मोदींनी दरवर्षी २ कोटी लोकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं.कुठे आहेत नोकऱ्या? दिल्लीत केजरीवाल यांनी रोजगारासाठी काय केलं? असा सवालही त्यांनी केला आहे.बेरोजगारीशी दोन हात करण्यासाठी मोदी सरकारनं काहीही प्रयत्न केलेले नाहीत.

बजेटमधून रोजगार निर्माण होतील अशी कोणतीही उपाययोजना केल्याचं मला दिसलेलं नाही असं म्हटलं होतं.काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी आर्थिक मोर्च्यावर केंद्र सरकारला घेरलं होतं.इतिहासातील सर्वात मोठं आणि लांब भाषणाचा हा बजेट असू शकतो,परंतु यात काहीही ठोस असं नाही.यात जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा नव्यानं सांगण्यात आल्या आहेत.२०२०-२०२१ च्या बजेटवर टीका करत त्यात काहीही नसल्याचं सांगितलं.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटवर नरेंद्र मोदी योगा करत असलेला व्हिडीओ पोस्ट केला होता.बजेटवर टीका करत राहुल गांधींनी मोदींना पुन्हा एकदा योगा करण्याचा सल्ला दिला.शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा अर्थमंत्र्यांचा दावा पोकळ आहे.त्यात काहीही तथ्य नाही.कृषी विकासदर दोन टक्क्यांवर आला आहे.शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी कृषी विकासदर ११ टक्क्यांवर असला पाहिजे,अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या