शिरूर तालुक्‍यात ७३ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले...

No photo description available.

शिक्रापुर, ता. ५ फेब्रुवारी २०२० (विशाल वर्पे): शिरूर तालुक्‍याच्या एकूण ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्‍यता आहे.त्याच पार्श्‍वभूमीवर जागा राखीव ठेवणे,प्रभाग विभाजन करणे,प्रभागमधील एकूण सदस्य ठरविणे असा सर्व कार्यक्रम पूर्ण झाला आहे.चक्राकार पद्धतीने वॉर्ड आरक्षण रचना सर्व ग्रामपंचायतच्या दि २७ ते ३० जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन पूर्ण झाल्या आहेत.त्यामध्ये तब्बल ७५९ सदस्यांपैकी ४१६ महिला सदस्यांना ग्रामपंचायतवर निवडून जाण्याची संधी मिळणार आहे.प्रभाग रचना झाल्यानंतर आता स्थानिक नेत्यांकडून उमेदवार चाचपणीला वेग आला आहे.ज्यांनी तयारी सुरू केली होती त्यांना त्या वॉर्डमध्ये आरक्षण न आल्याने नाराजांची संख्या देखील वाढली आहे.त्यामुळे आता तहसील कार्यालयाकडे अनेक इच्छुक उमेदवारांनी हरकतीसाठी धाव घेण्यास सुरुवात केली आहे.आरक्षण बदलामुळे स्थानिक नेते देखील खडबडून जागे होऊन गुपित बैठका घेऊ लागले आहेत.होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी अनेक तरुण उमेदवारांनी कंबर कसली आहे.उमेदवारांची जुळवाजुळव आणि भावकीच्या बैठकांना आता वेग येणार आहे.

नेकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने सर्वत्र ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.एका सदस्य पदासाठी तीन ते पाच इच्छुक मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.शिरूर तालुका चासकमानच्या पाण्याने आणि औद्योगिक वसाहतींमुळे सधन झाला आहे.त्याचबरोबर जमिनींचे प्लॉटिंग पाडून विकण्याचा धंदा देखील जोरात सुरू आहे.त्यामुळे अशा गुंठामंत्र्यांनी देखील निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकींमध्येही धनशक्तीचा बेसुमार वापर होणार असल्याची चिन्हे आहेत.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या