...म्हणून अभिषेक आणि करिश्माचे नाही झाले लग्न

Image result for abhishek bachchan and karisma kapoor
अभिनेता अभिषेक बच्चनने रेफ्युजी या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने धूम, बंटी और बबली, सरकार, गुरू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्याचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत झाले आहे. पण, त्यापूर्वी त्याचा साखरपुडा अभिनेत्री करिश्मा कपूर सोबत झाला होता.

पण काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही. अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा मोडल्यावर चर्चांना उधान आले होते. लग्न मोडण्याचे नेमके कारण काय? यावर अनेकजण चर्चा करत होते.

करिश्मा आणि अभिषेकने 'हा... मैंने भी प्यार किया' या चित्रपटात एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर त्या दोघांनी परत एकत्र काम केले नाही. अभिषेक आणि करिश्मा यांच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टीला आता अनेक वर्षं झाले आहेत. ते दोघे आपआपल्या आयुष्यात स्थिरावले देखील आहेत. करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले यावर बच्चन आणि कपूर कुटुंबियांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले आहे. करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी पीपल मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ही मुलाखत २००८ मध्ये छापून आली होती.जया बच्चन यांनी या मुलाखतीत त्यांच्या कुटूंबाची मूल्ये, त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना कशाप्रकारे संस्कार दिले याविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या होत्या. तसेच या मुलाखतीत त्यांनी ऐश्वर्या रायची सून म्हणून निवड का केली याविषयी देखील खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, आपली सूनही चांगल्या संस्काराची असावी असे मला नेहमीच वाटत होते आणि तेच संस्कार ऐश्वर्यामध्ये आहेत.


जया बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्यांना विचारण्यात आले होते की, याच कारणामुळे करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न मोडले होते का? त्यावर जया बच्चन यांनी काही सेकंद थांबून उत्तर दिले होते. त्यांच्या या पॉजमध्ये उत्तर असल्याचे सगळ्यांनाच कळले होते. त्यानंतर काही सेकंदानंतर त्या म्हणाल्या होत्या की, करिश्मा ही कपूर कुटुंबातील आहे. कपूर कुटुंबातील सगळ्यांनाच खूप चांगले संस्कार आहेत. तिचे वडील आणि मी अनेक वर्षांपासून खूप चांगले मित्र आहोत. त्यांचे माझ्या पतीसोबत देखील खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे कुटुंबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, असे मला वाटते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या