हिंगणघाट येथे पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज सुरुच...

Image may contain: one or more people, people standing and fire 
वर्धा, ता. ७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): हिंगणघाटमध्ये सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी एका प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.या पीडित तरुणीची प्रकृती ५ दिवसानानंतरही चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

पीडितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न आरोपी विकी नगराळे याने केला होता.त्यात ती ४०  टक्के भाजली होती.त्यानंतर तातडीने तिला नागपूरला हलविण्यात आलं होतं.पीडित तरुणीवर योग्य उपचार होत असून पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्याची गरज नसल्याचे डॉक्‍टर केसवानी यांनी सांगितले होते.पीडितेची प्रकृती स्थिर असली तरीही गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.तसेच या प्रकरणी आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे.प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या