पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर पलटवार...

Image may contain: 1 person, closeupदिसपूर, ता. ७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): देशात बेरोजगारी एवढी वाढली आहे की देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठ्यांनी मारतील,असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं होतं.यावर मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.ते आसाममधील कोकराझर येथील सभेत बोलत होते.

राहुल गांधींच्या या वक्तव्याचे पडसाद लोकसभेतही पाहायला मिळाले.भाजप खासदारांनी लोकसभेत गदारोळ घातला.त्यामुळे सभागृह तहकुब करावे लागले होते.दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना राहुल यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला होता.

मोदींनी देशात रोजगार निर्मिती केली नाही,तर सहा महिन्यात तरुण मोदींना लाढ्या-काढ्यांनी बडवतील,असं ते म्हणाले होते.मला कितीही लाठ्या
मारा.माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच आहे.हे कवच मला काहीही होऊ देणार नाही,असं म्हणत नरेंद्र मोदींनी राहुल यांना सुनावलं आहे.मोदींनी यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या