गोपीनाथ मुंडे यांचे मुंबईतील कार्यालय अखेर होणार सुरु...

Image may contain: 1 person, smiling, closeup
पुणे, ता. ७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे मुंबईतील कार्यालय येत्या बुधवारी (ता. १२) हे कार्यालय सुरू होणार आहे. परळीतील कार्यक्रमात मुंबईतील हे कार्यालय सुरु करण्याची घोषणा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी केली होती.गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कार्यकिर्दीत त्यांचे वरळीतील कार्यालय महत्वाचे सत्ताकेंद्र होते.


हे कार्यालय नव्याने सुरू करणार असल्याची घोषणा पंकजा यांनी १२ डिसेंबरला परळीत झालेल्या कार्यक्रमात केली होती.वरळीच्या शुभदा बिल्डिंगमधील कार्यालय २६ जानेवारीला पुन्हा सुरू करण्यात येणार होते; परंतु सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य,लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने ही तारीख पुढे ढकलण्यात आले होते.

त्यानंतर पाच फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार असल्याचाही चर्चा सुरु होत्या मात्र ५ फेब्रुवारी तारीख देखील पुढे ढकलण्यात आली होती.तो आता १२ फेब्रुवारीला होणार आहे.विधानसभेच्या निकालाचे पडसाद त्यांच्या भाषणात उमटले होते,शिवाय पक्षांतर्गत वादाची खदखद बाहेर पडली होती.भाजपच्या कोअर कमिटीमध्ये काम करणार नाही,असे सांगत त्यांनी पुढील काम गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे करणार असल्याचे जाहीर केले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या