शिरूर तालुक्यात अभिनेत्री मानसी नाईकची छेडछाड...

Image may contain: 1 person, smiling

मुंबई, ता. ७ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): मराठी चित्रपट अभिनेत्री मानसी नाईक हिच्या सोबत शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका कार्यक्रमात छेडछाड झाली. याबाबत मुंबई येथील साकीनाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून,  रांजणगाव पोलिसांकडे तो वर्ग करण्यात आला आहे.

अभिनेत्री मानसी नाईक एका कार्यक्रमासाठी शिरुर तालुक्यात आली होती. त्यावेळेस हा छेडछाडीचा प्रकार घडला. त्यानंतर मानसी नाईक मुंबईला जाताच तिने डॉ. संतोष पोटे, सुनीता पोटे आणि इतरांवर कलम ३५४ आणि ५०६ प्रमाणे साकीनाकी पोलिसात गुन्हा दाखल केला असून, रांजणगाव पोलिसांकडे तो वर्ग करण्यात आला आहे.


शिवसेनेच्या जिल्हा युवासेनेचे पदाधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य म्हणून भाऊ कदम, कुशल बद्रीके, प्राजक्ता हनमघर आदींसह प्रसिध्द अभिनेत्री मानसी नाईक दोन दिवसांपूर्वी रांजणगावमध्ये आले होते. यावेळी इतर कलाकारांचे सादरीकरण होत असतानाच नाईक यांना हा कार्यक्रमाच्या नियोजनात असलेल्या एका दांपत्याने त्यांना अर्वाच्च भाषेत वागणूक दिली. दरम्यान याच वेळी एका २१ वर्षीय युवकाने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन त्यांना लज्जा उप्तन्न होईल अशी वर्तणूक करताना नाईक यांनी संताप व्यक्त करताच या दांपत्याने त्या युवकाला तेथून पळवून लावले.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर नाईक यांचे काही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही त्यांना दिली गेली. या शिवाय नाईक यांच्या वयस्कर आई यांना रात्री बाराच्या सुमारास फोन करुन तुझ्या मुलीला रस्त्यावर आणून मारुन टाकू अशीही धमकी दिल्याची माहिती नाईक यांनी दिली. दरम्यान याबाबत सर्व माहिती संकलीत करुन मुंबई येथील साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्याची माहितीही नाईक यांनी दिली.दरम्यान, महाराष्ट्राची मी लाडकी नर्तिका-अभिनेत्री आहे. रांजणगाव हे महागणपतीमुळे खुपच पवित्र असे स्थान राज्यासाठी आहे. या ठिकाणी असा माझ्या सारखीच्या बाबतीत असा प्रकार होणे खुपच क्लेषदायक असल्याचे त्यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. याबाबत आपण कायदेशीर न्यायासाठी लढत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या