चौगुले इंडस्ट्रीजच्या कामगारांनी घेतली बच्चू कडूंची भेट...

Image may contain: 1 person, beard and closeup

पुणे, ता. ८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): विविध मागण्यांसाठी चौगुले इंडस्टीजच्या कामगारांनी कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना साकडे घातले.कामगार आयुक्‍त कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यवस्थापन आणि कामगार संघटनेची बाजू ऐकून घेत,पुढील आठवड्यात या विषयाचा आढावा घेतला जाणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांची कामगार व कुटुंबियांनी कामगार आयुक्‍तालय कार्यालयात भेट घेतली.यावेळी अतिरिक्‍त कामगार आयुक्‍त शैलेंद्र पोळ,सहायक कामगार आयुक्‍त पनवेलकर,राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले,राहुल साळुंखे,मोहन बोऱ्हाडे उपस्थित होते.

विविध कारणांमुळे चौगुले इंडस्ट्रीजमधील कामगार आणि व्यवस्थापनात वाद निर्माण झाला आहे.या विरोधात कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला ११३ दिवस पूर्ण झाले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या