कर्जमुक्ती हे आमचे कर्तव्यच...

Image may contain: Sandip Parbhane
मुंबई, ता. ८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची घोषणा केली.ठाकरे सरकारमध्ये नसताना ते सतत जी मागणी करीत होते ती मागणी ते सत्तेवर आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे विभागीय आयुक्‍त,जिल्हाधिकारी,जिल्हा निबंधक यांच्यासोबत संवाद साधला.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,'कर्जमुक्ती म्हणजे आपण शेतकऱ्यांवर उपकार करीत नसून त्यांचे आशीर्वाद घेतो आहोत अशा भूमिकेतून त्यांना मदत करावी.

तसेच महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने सहा महिन्यांचे काम अवघ्या ३५ दिवसांत पूर्ण केले.हा 'जोश' असाच टिकवून ठेवा व १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करा.अशा भूमिकेतून मदत करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या