तळेगाव येथे ग्रामविकास अधिकाऱ्यावर होणार कारवाई...

No photo description available.तळेगाव ढमढेरे, ता. ८ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): येथील ग्रामपंचायतमधील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. रोकडे यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या चेतना ढमढेरे यांनी केली आहे. त्यांनी यामध्ये लाखोंच्या पटीत गैरकारभार झाला असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्‍चित झाले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी विजय रोकडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे कामी जोडपत्र १ ते ६ सादर करण्यात आलेला आहे.यामध्ये आरोपनिहाय अभीकथन आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे.तसेच प्रमाणकाशिवाय खर्च रक्कम ८० लाख ८६ हजार ५२४ खर्च केल्याचे नमूद केलेले आहे.


याबाबत संबंधित ग्रामविकास अधिकारी रोकडे यांच्यावर फौजदारी करण्याची आवश्‍यकता आहे किंवा नाही याबाबत वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.ग्रामपंचायत चौकशी आणि ग्रामविकास अधिकारी यांची खातेनिहाय चौकशीची मागणी करण्यात आली.यावर पंचायत समिती शिरूर आणि जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.त्यामध्ये रोकडे यांनी अपहार केलेला असल्याचे निश्चित झाले असल्याचे दिसून येत आहे,असे सांगितले.

रोकडे हे आपल्या तपासासाठी तळेगाव ग्रामपंचायतमध्ये अनधिकृतरित्या येऊन जुने दप्तर तपासणी करत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.केलेल्या आरोपानंतर रोकडे हे तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयातून निघून गेले.यावेळी ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांना जुन्या दप्तरसहित येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

आणि त्यावेळी रोकडे यांनी आपल्यावरील आरोप झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये येऊन खटाटोप करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.तळेगाव ढमढेरे येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही. रोकडे यांच्यावर पंचायत समिती शिरूर आणि जिल्हा परिषदेकडून दोषारोप बनवलेले आहेत.दोषारोप निश्चित झालेला असून रोकडे यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन दप्तर देण्यास बंदी घातली आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या