हीच खरी सावित्रीची लेक...

Image may contain: 2 people, people standingपेठ, ता. ९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): समोर उभा ठाकलेलं संकट पाहून पाठ दाखवणारे अनेक मात्र पर्वताएवढ्या संकटांचा सामना करणारे विरळच! आजची कहाणी आहे अशाच पर्वताएवढ्या संकटांचा सामना करणाऱ्या नऊ वर्षीय चिमुरडीची! हाताला काम असलं तरचं घरातील चूल पेटणार अशी दयनीय अवस्था असलेल्या कुटुंबात रेश्‍मा रामदास जाधवचा जन्म झाला.

एक हुशार,चुणचुणीत,गुणी मुलगी आपल्यावर ओढवलेल्या जबाबदारीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये.या भावनेतून नाशिक महामार्गाजवळील जिल्हा परिषदेच्या शाळा प्रशासनानेही रेश्‍माला आपल्या भावासोबत शाळेत येण्याची परवानगी दिली.शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा घोलप यांनी शालेय प्रांगणामध्ये रेश्‍मासोबत येणाऱ्या तिच्या चिमुकल्या भावासाठी झोका बांधून दिला.

आई-वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळण्याच्या वयात परिस्थितीने ९ वर्षीय रेश्‍माला मात्र कुटुंबाचाच भार पेलण्यास भाग पाडले! घरात आई-वडिलांच्या दोन्ही हातांनी कमावलं नाही तर चूल पेटणार नाही हे विदारक वास्तव असल्यानं रेश्‍माच्या वडिलांना नाईलाजाने रेश्‍माच्या धाकल्या भावाची जबाबदारी रेश्‍माच्या खांद्यावर सोपवावी लागली.

घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे एका सावित्रीच्या लेकीसाठी शिक्षणाची कवाडं बंद होऊ नयेत यासाठी शालेय समिती,समस्त ग्रामस्थ माळेगाव,गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे,केंद्रप्रमुख संजीव टेंबे,शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे,सहशिक्षिका विद्या भापकर यांनी विशेष सहकार्य केले.

लहान भावाची जबाबदारी खांद्यावर आल्यानं पाठीवरचं दप्तर सुटतं की काय? असा गंभीर प्रश्‍न रेश्‍मापुढं निर्माण झाला होता.मात्र समोर उभा ठाकलेल्या संकटाला पाठ दाखवेल ती सावित्रीची लेक काय? या संकटातून वाट काढण्याचा निर्णय रेश्‍मानं घेतला! लहानग्या भावाची जबाबदारी आहे म्हणून घरी बसण्यापेक्षा भावालाच शाळेत घेऊन जाण्याचा धाडसी निर्णय घेत या चिमुकलीने अडचणीवर मात केली.

भविष्याच्या शोधात सरस्वतीची उपासन परिस्थितीने उभा केलेल्या संकटातून वाट काढत सावित्रीची लेक रेश्‍मा आता काखेला लहानगा भाऊ,हातात झोका बांधायला आईची जुनी साडी आणि पाठीवर दप्तर घेऊन उज्वल भविष्याच्या शोधात सरस्वतीची उपासना करतीये.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या