मनसेचे शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र...

Image may contain: 1 personमुंबई, ता. ९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दिशेने नव्या वाटचालीला सुरुवात केल्यानंतर शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकला ही बाळासाहेबांचीच भूमिका होती असं सांगत भगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व स्वीकारलं असं होत नाही.मनसेचा मोर्चा भाजपा पुरस्कृत आहे असा आरोप शिवसेनेने मनसेवर केला होता.यावरुन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

थोड्या दिवसाने अजित पवार शिवसेना चालवतील,सत्तेसाठी शिवसेनेने जी चूक केली आहे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत असं त्यांनी सांगितले.याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की,ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये,मुख्यमंत्र्यांकडे जेवढी गर्दी होत नाही तेवढी अजितदादांकडे असते.तसेच शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे पाहून शिवसेनेला मतदान करत नव्हते तर बाळासाहेबांना मानणारे,त्यांच्या हिंदुत्वाकडे पाहून शिवसेनेला मतदान करत होते.


पाकिस्तानी,बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली १४ वर्ष मनसे कुठे होती? मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे.त्याचसोबत काही दिवसांपूर्वी शहा-मोदी यांना राजकीय पटलावरुन बाजूला फेका असं टोकाचा विरोध केला.आता सौम्य झाले आहेत हे लोकांना दिसतं.हिंदुत्वाचा मुद्दा मनसेने कधी आणला नव्हता,भगवी वस्त्र घातल्याने कोणी हिंदुत्व स्वीकारलं असं होत नाही.तत्पूर्वी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही शिवसेनेला प्रत्युत्तर देत शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम झाली आहे,त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे.असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला होता.

मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत.शाखाप्रमुख ते सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे दुखावला गेला आहे.त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम राज ठाकरे करत असतील तर हे शिवसैनिक काही दिवसांत मनसेत मोठ्या प्रमाणात प्रवेश करतील हे आगामी काळात दिसेल असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.लोकांनी भाषणात टाळ्या वाजवल्या,मनोरंजन केलं अशी खोचक टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर केली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या