शर्मिला ठाकरे यांना हा प्रश्न विचारण्यात आला...

Image may contain: 1 person

मुंबई, ता. ९ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): अगदी थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भगवं वादळ गिरगाव चौपाटीवर धडकणार आहे त्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कृष्णकुंज या निवासस्थानावर माध्यमांशी संवाद साधला.तुमच्या कुर्त्याचा रंग आणि भाजपचा भगवा एकच आहे का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना विचारण्यात आला.

यावर मी भगवा नेहमी घालते,राजसाहेबही घालतात.आणि माझ्या कुर्त्याचा टॉमेटो कलर आहे.त्यासोबत वारकरी आणि छत्रपतींचाही भगवाच होता,असं दिलखुलास उत्तर शर्मिला ठाकरे यांनी दिलं.गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यावरुन निघणाऱ्या मनसेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शर्मिला ठाकरे आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्या-पदाधिकारी 'कृष्णकुंज'वरुन रवाना झाल्या.राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलतात?, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या