उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा 'सैराट'...

Image may contain: textउत्तरप्रदेश, ता. ९ फेब्रुवारी २०२० : उत्तरप्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यात खोट्या प्रतिष्ठेपायी तरुणीची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तरुणीचे घराशेजारी राहणाऱ्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते.त्या कारणावरून तरुणीच्या भावाने तिची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या हत्येच्या कटात आरोपीचे कुटुंबही सामिल होते,अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.पोलीस तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तरुणीचे घराशेजारी राहणाऱ्या तरुणाबरोबर अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते.तरुणीच्या प्रेमसंबंधाबाबत कुटुंबातील कोणालाही याची कल्पना नव्हती.पोलीस अधिकारी अभिषेक दीक्षित यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.मात्र ४ फेब्रुवारी रोजी तरुणी तिच्या प्रियकराबरोबर चोरून फोनवर बोलताना भावाला दिसल्याने तरुणीचे प्रेमप्रकरण उघड झाले.त्याने ही बाब कुटुंबीयांना जाऊन सांगितली.

हत्येच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणीचा शोध घेतला.त्यानंतर तरुणीचा मृतदेह शेतात पुरलेला सापडला.शवविच्छेदनानंतर तरुणीचा गळा दाबून हत्या केल्याचं निष्पन्न झालं.तरुणीच्या हत्येचा तपास करताना हत्येचा संशय कुटुंबीयांवर बळावल्याने पोलिसांनी कुटुंबाची कसून चौकशी केली.त्यात तरुणीची हत्या तिच्या भावाने केल्याचे उघड झाले.त्यानंतर तरुणीला घरातल्या मंडळींनी तरुणापासून दूर राहण्यास सांगितले,मात्र याला तिने विरोध दर्शवला.

यावेळी बहिणीची प्रतिक्रिया ऐकून रागावलेल्या तरुणीच्या भावाने तिची गळा दाबून हत्या केली.त्यानंतर घराजवळच्या शेतात भावाने आणि कुटुंबीयांनी मिळून तरुणीचा मृतदेह पुरला.त्यानंतर दिशाभूल करण्यासाठी पोलिसांकडे जात अज्ञातांनी तरुणीची हत्या केल्याची तक्रार दाखल केली.उत्तरप्रदेशच्या पिलीभीत जिल्ह्यातील बरखेडा गावात ही घटना घडली आहे.हत्येचं प्रकरण बाहेर येऊ नये,म्हणून कुटुंबाने बनाव रचल्याचं चौकशीत उघड झाली.त्यानंतर पोलिसांनी हत्येप्रकरणी तरुणीच्या भावाला अटक केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या