शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार...

Image may contain: text
पुणे, ता. १० फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): हिंगणघाटात एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आल्याची घटना ताजी असताना, देखील पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात उघडकीस आली आहे.या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते.आरोपी दररोज तिच्या शाळेबाहेर थांबून तिला त्रास द्यायचा आणि तिचा पाठलाग देखील करायचा.आरोपी शाळकरी मुलीला अशी धमकी द्यायचा कि, मी तुझ्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकेन आणि घरच्यांनाही जीवे मारेन,अशी धमकी देऊन आरोपीनं मुलीवर लैंगिक अत्याचार केला.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून २५ वर्षीय तरुणावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या